पुण्यात राज ठाकरेंकडून चिमुकल्याचं बारसं Raj Thackeray | BMC election | Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:33 IST2021-12-17T16:32:46+5:302021-12-17T16:33:04+5:30
राज यांनी ठेवलं बाळाचं नाव... पण का? आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सध्या ते पुण्यात आहे..या पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरेंना एक वेगळाच अनुभव आला. त्यांचे चाहते राज ठाकरे यांच्याकडे कोणती मागणी करतील याचा काही नेम नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. एका जोडप्याने राज ठाकरेंकडे त्यांच्या चार महिन्यांच्या बाळाचे नाव ठेवण्याची मागणी केली..राज ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्या बाळाचे नामकरण केले.