Next

नवाब मलिकांच्या निशाण्यावर आता प्रवीण दरेकर | Mumbai Bank | Pravin Darekar Nawab Malik

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:29 IST2022-01-05T17:29:09+5:302022-01-05T17:29:36+5:30

अनेक वर्षांपासून मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांची सत्ता आहे. यावेळीही सर्वच्या सर्व जागा जिंकत प्रविण दरेकरांनी घवघवीत यश मिळवलं. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण ज्या प्रवर्गातून ते निवडून आले त्यांना अपात्र ठरवल्याने त्याचा राजीनामा त्यांनी दिलाय.. दुसऱ्या एका प्रवर्गातूनही ते निवडून आले आहेत. त्यावरही आता मंत्री नवाब मलिकांनी निशाणा साधत ते पदही धोक्यात आणलंय..नवाब मलिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दरेकरांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...