Next

पोटनिवडणूक निकालांमुळे मोदी सरकारनं धोरण बदललं? Onion Price Cut Off | Modi Government Policy

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 14:56 IST2021-11-04T14:55:43+5:302021-11-04T14:56:20+5:30

गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्यानं वाढ होत होती, सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या. मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत उत्पादन शुल्कात कपात केली त्यामुळे पेट्रोल ५, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झालं. इंधन आघाडीवर दिलासा दिल्यानंतर आता मोदी सरकारनं कांद्यांचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. एकीकडे पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव मोदी सरकारनं कमी केले अशी टीका विरोधक करत असताना आता मोदींनी कांद्याचे भाव नियंत्रणात आणायला सुरुवात केलीय.