Next

बैठका पवार घेणार, निर्णय पवार घेणार मग मुख्यमंत्रीपदाचा चार्जच का घेत नाहीत? Uddhav Thackeray Pawar

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 16:00 IST2022-01-12T16:00:38+5:302022-01-12T16:00:58+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यामुळे तीन महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्या मानेवर महिन्याभरापूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे मुख्यमंत्री ना मंत्रालयात जाऊ शकतायंत ना प्रत्यक्ष बैठकांना हजेरी लावू शकतायंत. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनालाही ते येऊ शकले नाहीत. आता यावरुनच भाजपनं शरद पवारांना मुख्यमंत्री करा, असा टोमणा मारलाय. भाजपनं नेमका काय टोला लगावलाय पुढे पाहचंय पण त्याआधी एसटी संपावर तोडगा काढायला पवारांना मैदानात का उतरावं लागलं ते पाहुयात...