दोडामार्गात फासकीत अडकलेल्या बिबट्याचा थरार कॅमेऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 15:31 IST2018-12-25T15:30:43+5:302018-12-25T15:31:14+5:30
मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. फासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याची चाललेली धडपड आणि त्याने धारण केलेले आक्राळ-विक्राळ रूप ...
ठळक मुद्देदोडामार्ग तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या बरीच आहे. त्यात बिबट्या, रानडुक्कर, गवेरेडे, सांबर यांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्यामुळे शिकारीचे प्रमाणही वाढले आहे.
मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. फासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याची चाललेली धडपड आणि त्याने धारण केलेले आक्राळ-विक्राळ रूप पाहून बघ्यांची पाचावर धारण बसली.वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले, मात्र अथक प्रयत्नानंतर बिबट्याने स्वत:ची सुटका करून घेत जंगलात धूम ठोकली.