Next

जवाहर द्विप येथील डिझेल टँकवर वीज पडली ! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 21:28 IST2017-10-06T21:26:04+5:302017-10-06T21:28:52+5:30

मुंबई - भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्विप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली आणि तेथे असलेल्या ...

मुंबई - भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्विप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली आणि तेथे असलेल्या डिझेल टँकना आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे. या बेटावर १५ ते २० टँक आहेत. त्यापैकी १२ नंबरच्या टँकला आग लागल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.