लालबागच्या राजाचे प्रथम मुखदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:53 IST2017-08-21T23:51:20+5:302017-08-21T23:53:51+5:30
मुंबई - मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचे आज प्रथम मुखदर्शन झाले. आज संध्याकाळी लालबागच्या राजाच्या मंडपात प्रसारमाध्यमांसह गणेशभक्तांसाठी बाप्पांचे प्रथम दर्शन झाले. सालाबादप्रमाणे लालबागच्या राजाच्या मंडपात लक्षवेधी आणि भव्य आरास करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या सिंहासनावर चक्क कासवाची आरास करण्यात आली आहे. (फोटो/व्हीडिओ - दत्ता खेडेकर, सुशील कदम)