Next

आधी प्रेम, मग ब्रेकअप, त्यानंतर असं काही घडलं की सगळेचं हळहळले...| Crime Maharashtra Nashik Case

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 23:01 IST2022-02-14T23:00:47+5:302022-02-14T23:01:21+5:30

हा फोटो आहे, गोरख बच्छावचा.. जो आज या जगात नाहीये.. याला कारण ठरलंय त्याने केलेलं प्रेम.. आणि हे प्रेम मिळवण्यासाठी निवडलेला मार्ग... शेजारी फोटोत दिसणाऱ्या या तरूणीचं नाव आहे कल्याणी सोनावणे.. जिच्यावर गोरख जिवापाड प्रेम करत होता... आणि तिनेच टाकेल्या माचिसच्या काडीने तो जिवंत जळाला... दोन दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर, जीव सोडून गेला... या प्रकरणाचा घटनाक्रम अंगावर काटा आणणारा आहे.... मन सुन्न करणारा आहे.. आणि काही प्रश्न मागे सोडून जाणारा आहे... त्या दिवशी नाशिकच्या लोणोहेर गावात नेमकं काय घडलं, तुम्हाला सांगतो.. पण त्यापूर्वी या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली, हे सांगणं महत्त्वाचंय..