Next

विधानसभा अध्यक्षांची निवड अशी होते | Legislative Assembly Speaker Election | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 12:31 PM2021-07-02T12:31:17+5:302021-07-02T12:31:43+5:30

विधानसभा अध्यक्षपदावरनं कधी नव्हे तो राज्याच्या राजकारणात आखाडा रंगताना दिसलाय. म्हणजे एकतर हे पद रिक्त का ? यावरनं विरोधक आरोप करतायंत त्याचवेळी हे पद कुणाला मिळायला हवं यावरनं सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. म्हणूनच विधानसभा अध्यक्षाची निवड नेमकी कशी होते?, का हे पद खूप महत्त्वाचं आहे? याचा उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीची तांत्रिक-कायदेशीर प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.