Next

फडणवीसांशी तू तू मै मै करून उत्पल पर्रिकर धर्मसंकटात सापडलेत? Utpal Parrikar | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:48 IST2022-01-19T17:48:14+5:302022-01-19T17:48:38+5:30

गोव्यात सध्या पर्रिकर विरुद्ध फडणवीस संघर्षाची चर्चा आहे... देवेंद्र फडणवीस हे गोव्यात भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून सगळी सूत्र हलवतायत.... तर गोव्यात ज्यांना भाजपला ओळख मिळवून दिली... त्या मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर, पणजीच्या जागेवर दावा ठोकून आहे.... फडणवीसांनी त्यांना तिकीट मिळणार नाही, याचे संकेत आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेतून दिल्यानंतर फडणवीस- पर्रिकर वादाची चर्चा सुरु झालेय... त्यातच शिवसेनेच्या संजय राऊत आणि आपच्या अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रिकरांसाठी गळ टाकल्यामुळेही बऱ्याच राजकीय तर्कवितर्कांना ऊत आलाय... पर्रिकरांचा बंड कसं थोपवायचं या धर्मसंकटात फडणवीस सापडलेले असतानाच, पर्रिकर सुद्धा आता कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा या धर्मसंकटात सापडल्याचं चित्र दिसतंय... पर्रिकरांचा दावा... आणि फडणीसांची भूमिका या सगळ्यात गोव्याच्या राजकरणात आता नेमकं काय घडतंय... मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्यासमोर नेमके काय पर्याय आहेत... जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...