Next

मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? R. R. Patil यांच्या लेकीची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 15:40 IST2021-11-10T15:39:04+5:302021-11-10T15:40:33+5:30

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाची आठवण आजही काढली जाते. आबांनी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे दाखले आजही दिले जातात. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी आर. आर. पाटील यांचं आजारपणामुळे अकाली निधन झालं होतं. पण त्यापूर्वी २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आर. आर. पाटील यांनी आपल्या गावाचा दौरा केला होता. आबांच्या हाच शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांबाबत आबांची लेक स्मिता पाटील यांनी एक भावूक पोस्ट लिहिलीय. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. पप्पांचा शेवटचा दिवस! असं शिर्षक देऊन स्मिता पाटील यांनी ही पोस्ट लिहिलीय.