मनसे फॉर्मात होती ते दिवस परत येणार, 'हा' आहे राज ठाकरेंचा मास्टरप्लान? Raj Thackeray's Masterplan
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 15:10 IST2021-12-07T15:10:05+5:302021-12-07T15:10:22+5:30
राज्यातील आगामी महापालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष रणनिती आखतायत. निवडणुका उंबरठ्यावर आहेत आणि आता राज ठाकरेही अॅक्शन मोडमध्ये आलेत. मनसेचे जुने वैभवाचे दिवस परत आणायचा चंगच राज ठाकरेंनी बांधलाय, त्यासाठी मास्टरप्लान आखलाय. राज महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत पण यंदाचा महाराष्ट्र दौरा वेगळा असेल. किंवा मनसेच्या स्थापनेपूर्वी जसा राज यांनी महाराष्ट्र दौरा काढला होता तसाच काहीसा दौरा, तसंच शक्तिप्रदर्शन, तसंच वातावरण या दौऱ्यात असेल अशा पद्धतीनं नियोजन सुरु झालंय.