मुंबईतल्या करी रोडचा पूल लटकलेलाच, आठ वर्षांपूर्वीच मिळाला निधी, तरीही काम अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:28 IST2017-10-05T19:28:26+5:302017-10-05T19:28:30+5:30
अक्षय चोरगे मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे ‘करी रोड’. लालबाग, वरळी, लोअर परळ ...
अक्षय चोरगेमुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे ‘करी रोड’. लालबाग, वरळी, लोअर परळ या भागांमध्ये कामानिमित्त लाखोंच्या संख्येने या स्टेशनवर रेल्वे प्रवाशांची वर्दळ असते. सकाळी आणि सायंकाळी स्थानकावर गर्दी उसळते. तथापि, रेल्वेस्थानकावर ये-जा करण्यासाठी फक्त एकच पूल असल्याने पुलावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रोजच अभूतपूर्व कोंडीचा प्रसंग उभा राहतो. या पुलासाठी पालिकेकडून सुमारे दीड कोटींचा निधी आठ वर्षांपूर्वी देण्यात आला, तरीही हे काम मार्गी लागलेले नाही, हे दुर्दैव.