Next

चंद्रकांत पाटील शिवसेनेला साद घालतायत का? Chandrakant Patil | Uddhav Thackeray | Shiv Sena | BJP |

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 17:47 IST2022-01-07T17:46:35+5:302022-01-07T17:47:19+5:30

२०१९च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले... आणि निवडणूकपूर्व झालेली शिवसेना भाजप युती पुन्हा तुटली... उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले... तर पुन्हा येण्याचा दावा करणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत गेले... पण शिवसेनेने भाजपपासून फारकत घेत वेगळा संसार थाटला असला, तरीही शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चा महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आजतागायत काही थांबलेल्या नाही.. मागच्या काही दिवसांत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वारंवार शिवसेनेला एकप्रकार साद घातली... शिवसेना अस्वस्थ असल्याचा दावा चंद्रकांत दादांनी केला... आणि त्यामुळे पुन्हा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना हवा मिळाली.. चंद्रकांत दादा नेमकं काय म्हणाले होते, आणि शिवसेना भाजप युतीला येत्या काळात मुहूर्त मिळू शकतोय का? या विषयी या व्हिडीओत बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...