Next

वाझेंबाबत मोठा खुलासा, स्कॉर्पिओ तपास करताना वाझे कुठे होते? Sachin Vaze | Antilia Bomb Scare

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 00:41 IST2022-02-11T00:40:42+5:302022-02-11T00:41:00+5:30

काही महिन्यापुर्वी महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा होती ती सचिन वाझे या नावाची.. कारण त्या व्यक्तीने फिल्मी स्टाईलने जे काही केलं ते धक्कादायक होतं. सचिन वाझेमुळे पोलीस आयुक्तही पदावरुन गेले आणि गृहमंत्रीसुद्धा.. त्यावेळी बऱ्याच काही घडामोडी घडल्या. या सर्व प्रकरणांचा तपास सुरु आहे. नवनवीन खुलासेही होतायत.. आता उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या अहवालातून महत्त्वाची माहिती पुढे आली. त्यामुळे निलंबित पोलीस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात गेला, असंच म्हणावं लागेल.. स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थानाबाहेरआढळून आल्याचं समजताच वाझेंनी काय केलं, याची माहिती या अहवालात आहे