Next

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 23:51 IST2017-09-28T23:51:09+5:302017-09-28T23:51:33+5:30

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात आठव्या माळेला गुरुवारी अष्टमीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई फुलांनी सजलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला निघाली. वर्षातून ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात आठव्या माळेला गुरुवारी अष्टमीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई फुलांनी सजलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला निघाली. वर्षातून एकदा होणारा हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. अष्टमीला दुर्गेने महिषासूराचा वध केल्याने हा दिवस नवरात्रोत्सवात महत्वाचा मानला जातो. यादिवशी अंबाबाई मंदिरातही अष्टमीच्या जागराचा होम होतो. तत्पूर्वी रात्री साडे नऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर फुलांनी सजलेल्या वाहनात विराजमान झालेली श्री अंबाबाई देवीची उत्सवमूर्ती महाद्वारातून नगरवासियांच्या भेटीला निघाली.