Next

मोदींनी सभेसाठी पणजीऐवजी म्हापसाच का निवडलं? Narendra Modi Goa Mapusa | Utpal Parrikar Michal Lobo

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:41 AM2022-02-11T00:41:57+5:302022-02-11T00:42:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात सभा घेतली... गोव्याच्या निवडणुकीत यंदा सर्वाधिक काय चर्चेत आलं असेल... तर मनोहर पर्रिकर यांच्या मुलाचं बंड... उत्पल पर्रिकर यांनी थेट पक्षाला आव्हान दिलं... मोदी - शहांपासून अनेक ज्येष्ठ मंडळींनी समजावलं.. पण ते ऐकले नाहीत.. आणि त्यांनी पक्षासमोरच आव्हान उभं केलंय.. अशात नरेंद्र मोदी जेव्हा गोव्यात सभा घ्यायला येतील.. तेव्हा ते कुठे सभा घेतील.. अशा चर्चा होत्या.. काहींना वाटत होतं.. की गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत मोदींची तोफ धडाडेल.. बंडखोरांना मोदी इथूनच सुनावतील.. विजयाचा विश्वास व्यक्त करतील... आणि धास्तावलेल्यांना दिलासा मिळेल.. पण मोदींनी गोव्याची राजधानी पणजी ऐवजी म्हापसा निवडलं.. जे पणजीपासून फार नाही, १३ किलोमीटर दूर आहे.. पण असं का? पणजी सोडून मोदी म्हापशात का गेले? याला उत्लप पर्रिकरांच्या बंडाची किनार आहे? की खरं कारण काही वेगळंच आहे.... या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...