अनिकेत जाधवला लहानपणापासून फुटबॉलचे वेड, मार्गदर्शक महेश पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:13 IST2017-10-05T18:12:59+5:302017-10-05T18:13:20+5:30
पुणे : अनिकेत जाधवला लहानपणा पासून फुटबालचे वेड होते, शाळेत व मैदानावर असताना त्याच्याकडे हातात फुटबॉल असायचाच, असे सांगली ...
पुणे : अनिकेत जाधवला लहानपणा पासून फुटबालचे वेड होते, शाळेत व मैदानावर असताना त्याच्याकडे हातात फुटबॉल असायचाच, असे सांगली येथील अनिकेतचे लहानपणीचे मार्गदर्शक महेश पाटील यांनी लोकमतला सांगितले. पाटील म्हणाले, अनिकेत हा वयाच्या 8व्या वर्षी सांगली येथे क्रीडा प्रबोधिनी आला. मी त्याचा फिटनेस घेत असे, कारण प्रथम वर्षी फिटनेस असतो, तेव्हा तो सारखा फुटबॉल खेळायचा, वर्गात सुद्धा त्याचा पाया जवळ फुटबॉल असे. तो रात्री जेव्हा झोपायचा तेव्हा फुटबॉल त्याचा छाती जवळ कावताळलेला असायचा, तेव्हा मी वरिष्ठ अधिकारी याना त्याचे हे फुटबॉल वेड सांगितले. मग दुसऱ्या वर्षी त्याला पुण्यात जयदीप अंगिरवर सरांकडे पाठवले.

















