तुमची परिस्थिती कशी बदलाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 12:53 IST2020-09-22T14:35:36+5:302020-09-30T12:53:36+5:30
आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला अथक मेहनत करण्याची जिद्द अंगी जोपासली पाहिजे. आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर जीवनामध्ये अनेक संकटे झेलण्याची शक्ती आपल्या अंगी निर्माण करावी लागेल. आपला जन्मच जर गरिब कुटुंबामध्ये झाला असेल तर आपण लाज बाळगू नये. आपण आपल्या कुटुंबाला गरिबीच्या विळख्यातून कसे बाहेर काढू शकतो याचा विचार करावा. जन्मत: आपल्या वाट्याला दारिद्रय येणे म्हणजे आयुष्यात एकप्रकारे यशाची शिखरे गाठण्यासाठी आत्मविश्वास मिळणे. म्हणून आपली परिस्थिती ही आपणच बदलू शकतो. त्यामुळे तुमची परिस्थिती कशी बदलाल? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा