Next

मनाला वळण कसे द्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 12:58 IST2020-09-22T13:56:35+5:302020-09-30T12:58:42+5:30

मन हे आपल्या जीवनाचे एक अविभाज्य घटक असते. माणसाचे मन जर चांगले असेल तर त्याला आयुष्यात सगळ्या गोष्टी जिंकता येतात. आपल्याजवळ जे काही आहे त्यांमधील एक छोटा खारीचा तुकडा दुस-याला देण्यासाठी सुद्धा आपले मन मोठे असावे लागते. आयुष्यात जीवन जगत असताना मनामध्ये असंख्य गोष्टींचा विचार सुरु असल्यामुळे आपले मन अस्वस्थ होते आणि कामामध्ये आपले लक्ष लागत नाही. आपण ठरवलेल ध्येय गाठायची इच्छा जर आपल्या मनामध्ये असेल तर आपल मन चंचल होण्यापासून कोणीही आपल्याला परावृत्त करू शकत नाही. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै मनाला वळण कसे द्याल ? यावर काय प्रवचन करत आहेत ते हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल