Next

संसार कौशल्याने कसा करायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 12:51 IST2020-09-22T14:48:54+5:302020-09-30T12:51:13+5:30

जीवन जगत असताना असे म्हटले जाते की, संसाराची गाडी ही दोन चाकांवर चालत असते. संसारातल्या या गाडीचे एक चाक जरी निघाले तर संसार मोडण्याची दाट शक्यता असते. समाजामध्ये मुलगा व मुलगीचे लग्न झाल्यावर ते एका विशिष्ट बंधनात अडकले जातात. दोघंही नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करत असतात. दोघांमध्ये जर समन्वयाचा अभाव जाणवू लागला तर संसार दिर्घ काळ टिकू शकत नाही. त्यामुळे लग्न झाल्यावर आपल्याला संसाराची घडी नीट कशी बसवता येईल याचा विचार केला पाहिजे. म्हणून संसार कौशल्याने कसा करायचा? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा