Next

रक्षाबंधनानिमित्त अकोल्यातील बाजारपेठ सजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 18:24 IST2017-08-04T18:23:49+5:302017-08-04T18:24:26+5:30

अकोला : भाऊ आणि बहिणीच्या अनोख्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अकोल्यातील बाजारपेठ ...

अकोला : भाऊ आणि बहिणीच्या अनोख्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अकोल्यातील बाजारपेठ विविधरंगी राख्यांनी सजली आहे. बाजारपेठेत अनेकविध आकर्षक प्रकारच्या विविध राख्या उपलब्ध आहेत. पारंपरिक रेशमी धाग्या पासून इमिटेशन जार्दोशी कलाकुसर केलेल्या, कार्टून मधल्या प्रसिद्ध व्यक्तिरेखा अशा विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे.