अकोल्यात अवैध सावकार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 20:18 IST2017-08-10T20:15:35+5:302017-08-10T20:18:33+5:30
अकोला, दि. 10 - सावकारीचा कोणताही परवाना नसताना अवैधरित्या सावकारी करणा-या अकोला येथील एका इसमावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे गुरुवारी कारवाई ...
अकोला, दि. 10 - सावकारीचा कोणताही परवाना नसताना अवैधरित्या सावकारी करणा-या अकोला येथील एका इसमावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे गुरुवारी कारवाई करण्यात आली. संदीप जाधव असे या इसमाचे नाव आहे. जिल्हा उपनिंबधक अनिल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाच्या चमूने जाधव यांच्या घरी छापा मारला. यावेळी कोरे धनादेश ७८, कोरे मुद्रांक २, इसार पावत्या ५, खरेदी खत ६, व्यवहार नोंदी व डाय-या ९, वाहन पावती १, आर.सी. बुक ३, टीसीए फॉर्म ४, उसनवार पावत्या ५ असे साहित्य जप्त करण्यात आले.