Vastu Tips: तुम्हीही घरातील दरवाजावर लावलीय का ही वस्तू? लगेच हटवा, अन्यथा दुःखी राहील घर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:55 PM2023-01-30T16:55:31+5:302023-01-30T16:55:57+5:30

Vastu Tips: घरामध्ये घड्याळ योग्य ठिकाणी लावलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा वाईट काळ सुरू होण्यास  वेळ लागणार नाही. चुकीच्या ठिकाणी लावलेले घड्याळ वास्तूदोष निर्माण करते.

Vastu Tips: Have you also installed this item on the door of the house? Remove it immediately, otherwise the house will remain unhappy | Vastu Tips: तुम्हीही घरातील दरवाजावर लावलीय का ही वस्तू? लगेच हटवा, अन्यथा दुःखी राहील घर

Vastu Tips: तुम्हीही घरातील दरवाजावर लावलीय का ही वस्तू? लगेच हटवा, अन्यथा दुःखी राहील घर

googlenewsNext

घरामध्ये घड्याळ योग्य ठिकाणी लावलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा वाईट काळ सुरू होण्यास  वेळ लागणार नाही. चुकीच्या ठिकाणी लावलेले घड्याळ वास्तूदोष निर्माण करते. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते. तसेच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वास्तूशास्त्रामध्ये घड्याळ लावण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचं अवश्य पालन केलं पाहिजे. विशेषकरून दरवाजावर घड्याळ लावण्याची चूक खूप महागात पडू शकते.

वास्तूशास्त्रानुसार कधीही घरातील मुख्य दरवाजा किंवा कुठल्याही दरवाजावर घड्याळ लावता कामा नये. मुख्य दरवाजावर घड्याळ लावल्याने घरात नकारात्मकता येते. घरामध्ये कुठल्याही दरवाजावर घड्याळ लावलेले असल्यास त्याच्याखालून जाणाऱ्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे कधीही दरवाजावर घड्याळ लावता कामा नये.

भिंतीवर घड्याळ लावण्यासाठीचे नियम

- भिंतीवर घड्याळ हे उत्तर पूर्व दिशेला लावणे सर्वात शुभ असते. पूर्व आणि उत्तर दिशेला सकारात्मक उर्जेचा भंडार असतो. अशा दिशेला घड्याळ लावल्याने घरात सकारात्मकता येते. तसेच कुटुंबातील व्यक्तींची उन्नती होते. धनलाभ होतो.
- कधीही दक्षिण दिशेला घड्याळ लावता कामा नये. असं केल्याने घर कार्यालयात नकारात्मक ऊर्जा वाढते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा समजली जाते. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्याने कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होतो .
- तसेच घरात बंद पडलेले घड्याळ कधीही ठेवता कामा नये. खराब बंद पडलेले घड्याळ हे घरात गरिबी घेऊन येते. प्रगती थांबते. वित्तहानी होते.

Web Title: Vastu Tips: Have you also installed this item on the door of the house? Remove it immediately, otherwise the house will remain unhappy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.