हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:08 AM2024-05-27T11:08:53+5:302024-05-27T11:10:41+5:30

आयपीएल फायनलवर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.  

Amitabh Bachchan disappointed after KKR win IPL felt bad for pretty young lady owner of SRH Kavya Maran | हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."

हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."

आयपीएल (IPL) फायनल मध्ये काल सनराइजर्स हैदराबाद(SRH) आणि कोलकता नाईट रायडर्स (KKR) मध्ये सामना रंगला. यामध्ये  शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) KKR ने बाजी मारत यंदा IPL ची ट्रॉफी जिंकली. मात्र हैदराबादचा पराभव झाल्याने महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan( यांचा हिरमोड झाला. विशेषत: त्यांना SRH ची तरुण मालकीण काव्या मारनसाठी वाईट वाटलं. त्यांनी काव्याला धीर देण्यासाठी चार शब्दही ब्लॉगवर लिहिले. आयपीएल फायनलवर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.  

अमिताभ बच्चन रोज आपल्या ब्लॉगवर व्यक्त होत असतात. त्यांना क्रिकटमध्ये बराच रस आहे. कालच्या आयपीएल फायनलनंतर अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहिला. हैदराबादचा पराभव झाल्याने ते प्रचंड निराश झाले. ते लिहितात, 'IPL संपली आहे. KKR चा विजय झाला. खूपच निराशा झाली कारण हैदराबाद ही अतिशय चांगली टीम होती आणि त्यांनी इतर प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळी केली. पण सुंदर तरुणी, हैदराबादची मालकीण काव्या मारनला स्टेडियममध्ये भावूक होत रडताना पाहून वाईट वाटलं. तिने कॅमेऱ्यापासून चेहरा फिरवला हे खरंच खूप वाईट होतं. पण असो, उद्याचा दिवस वेगळा असेल.'

काव्या मारनला रडताना पाहून लाखो चाहतेही काल भावूक झाले होते. अमिताभ बच्चन यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व सामन्यांमध्ये हैदराबादने कमाल कामगिरी केली होती. काल झालेला सामना सर्वांनाच अनपेक्षित होता. 

सामना जिंकल्यानंतर शाहरुख खानने पत्नी गौरी आणि तीनही मुलांना मिठी मारत आनंद साजरा केला. खान कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Web Title: Amitabh Bachchan disappointed after KKR win IPL felt bad for pretty young lady owner of SRH Kavya Maran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.