तरुणाई ‘संभ्रमाच्या’ फेर्यात
By Admin | Updated: August 12, 2014 23:24 IST2014-08-12T23:24:44+5:302014-08-12T23:24:44+5:30
लोकमत सर्वेक्षण:सुशिक्षित असुनही तरूणाईच्या जीवनात ‘अर्थ’ नाही!

तरुणाई ‘संभ्रमाच्या’ फेर्यात
वाशिम: माता-पित्यांचा वृद्धापकाळातील आधारवड, देशाचे भवितव्य, आदी बिरुदावलीने ओळखला जाणारी तरूणाई आजमितीला संभ्रमाच्या फेर्यात अडकली आहे. चोहोबाजूंनी येणारी संकटांचे चक्रीवादळ त्यांना कोलमडून टाकत आहे. सुशिक्षित असुनही त्यांच्या जीवनात ह्यअर्थह्ण नसल्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे. यातूनच व्यसनाधिनता, गुन्हेगारी या अपप्रवृत्तीकडे युवक वळत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर दुसरीकडे मनगटाच्या बळावर, प्रबळ इच्छाशक्तिच्या जोरावर आशावादी गटातील युवक यशाचे शिखर गाठत आहेत. लोकमतच्या सर्व्हेतून या बाबी अधोरेखित झाल्या आहेत.
व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांचा अभाव, वशिलेबाजी व इतर कारणांमुळे क्षमता असूनही बेरोजगार राहणार्या युवकांचा राज्यात मोठा वर्ग आहे. बेरोजगारीमुळे स्वत:च्या पायावर धड उभाही राहू न शकणारा हा युवक वृद्धापकाळात आई-वडिलांचा आणि देशाचा सक्षम आधारस्तंभ कसा होऊ शकेल? ही सर्वांसाठीच आत्मचिंतनाची बाब आहे. याच बेरोजगारीमुळे आजमितीला त्यांना वाम मार्गाला लावले आहे. लोकमतशी बोलताना तरूणाईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली