मानोरा-दिग्रस रस्त्यावर दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:21 IST2017-09-11T02:20:29+5:302017-09-11T02:21:20+5:30
मानोरा: येथून दिग्रसकडे जाणार्या रस्त्यावरील बुलडाणा अर्बन वेअर हाउसजवळ दुचाकी चालकाने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघातात मानोरा येथील सूरज दयाराम राठोड (वय २0 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास घडली.

मानोरा-दिग्रस रस्त्यावर दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: येथून दिग्रसकडे जाणार्या रस्त्यावरील बुलडाणा अर्बन वेअर हाउसजवळ दुचाकी चालकाने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघातात मानोरा येथील सूरज दयाराम राठोड (वय २0 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, मानोरा शहरातील नाईक नगर येथील रहिवासी युवक सूरज दयाराम राठोड हा आपल्या एमएच ३७ बी १८0१ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने प्रवास करीत असताना दिग्रस रस्त्यावरील विठोली गावाजवळ असलेल्या बुलडाणा अर्बन वेअर हाउसजवळ त्याने समोर धावत असलेल्या टॅक्टरला मागून धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रामकृष्ण मळघने, पोलीस उपनिरीक्षक राहुल काटफाडे, धर्माजी डाखोरे आदींसह पोलीस ताफा घटनास्थळी रवाना होऊन दिग्रस ते मानोरा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलीस शोध घेत आहेत.