युवा सप्ताहांतर्गत अनुभव कथन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:34+5:302021-01-17T04:35:34+5:30

----------- शेतकरी कापूस पीकविम्याच्या प्रतीक्षेत वाशिम : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी २०१८-१९ मध्ये सोयाबीन तूर, कापूस आदी पिकांसाठी पीकविमा काढला; ...

Youth Weekend Experience Statement Program | युवा सप्ताहांतर्गत अनुभव कथन कार्यक्रम

युवा सप्ताहांतर्गत अनुभव कथन कार्यक्रम

-----------

शेतकरी कापूस पीकविम्याच्या प्रतीक्षेत

वाशिम : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी २०१८-१९ मध्ये सोयाबीन तूर, कापूस आदी पिकांसाठी पीकविमा काढला; परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठीच विमा मंजूर झाला असून, नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना अद्यापही विमाभरपाईची प्रतीक्षा कायमच आहे.

-------

अनसिंग येथे ३२ हजार क्विंटल कापूस खरेदी

अनसिंग : सीसीआयकडून वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी सुरूच असून, १६ जानेवारीपर्यंत या केंद्रावर ३२ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

------------

सेवानिवृत्तांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

वाशिम : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यास कोषागार विभागाच्या ०८ डिसेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र संबंधित कार्यालयात सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

-----------

अ.ज. विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश

वाशिम : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीत सन २०२१-२०२२ या सत्रात प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला, तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत विनामूल्य मिळणार आहेत.

Web Title: Youth Weekend Experience Statement Program