अपघातात युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST2021-05-23T04:41:05+5:302021-05-23T04:41:05+5:30

जालना-नागपूर या महामार्गाचे पुलगाव-जालना दरम्यान सध्या काम सुरू आहे. धानोरा ताथोड गावानजीक रस्ता काम सुरू आहे. या दरम्यान काही ...

The youth was killed on the spot in the accident | अपघातात युवक जागीच ठार

अपघातात युवक जागीच ठार

जालना-नागपूर या महामार्गाचे पुलगाव-जालना दरम्यान सध्या काम सुरू आहे. धानोरा ताथोड गावानजीक रस्ता काम सुरू आहे. या दरम्यान काही गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. गतिरोधकावर पांढरा पट्टा मारला जात नाही. परिणामी गतिरोधकावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन येऊन धडकते किंवा दुचाकीस्वाराचा अपघात घडतो. २२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान एमएच २९ एएस ६१४० क्रमांकाच्या दुचाकीने अमोल तानबाजी पाथोडे (३२) रा. वैतखेड, ता. जि. यवतमाळ हा धानोरा-ताथोड मार्गे कारंजाकडे येत असताना धानोरा गावानजीक असलेल्या गतिरोधकावरून पडला. डोक्याला जबर मार लागल्याने यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन पथकाचे श्याम सवाई यांनी तात्काळ धानोरा गावातील नरेंद्र कावरे व संदीप ताथोड याच्याशी संपर्क साधून घटनास्थळ गाठले होते.

Web Title: The youth was killed on the spot in the accident