गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By Admin | Updated: May 8, 2017 01:31 IST2017-05-08T01:31:53+5:302017-05-08T01:31:53+5:30

मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Youth suicide | गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

मालेगाव : तालुक्यातील मारसूळ येथील उमेश माणिक घुगे (वय १९ वर्षे) या युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, ७ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारसूळ येथील उमेश घुगे याने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.
याबाबत मृतकाचे काका मोतीराम सदाशिव घुगे यांनी मालेगाव पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Youth suicide