‘सुसाईड नोट’ लिहून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:39+5:302021-09-24T04:48:39+5:30

वाशिम : येथून जवळच असलेल्या झाकलवाडी फाट्यानजिक एका झाडाला गळफास घेऊन ३३ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. गोपाल रविआप्पा महाजन ...

Youth commits suicide by writing 'suicide note' | ‘सुसाईड नोट’ लिहून युवकाची आत्महत्या

‘सुसाईड नोट’ लिहून युवकाची आत्महत्या

वाशिम : येथून जवळच असलेल्या झाकलवाडी फाट्यानजिक एका झाडाला गळफास घेऊन ३३ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. गोपाल रविआप्पा महाजन (जवाहर नवोदयसमोर, वाशिम) असे मृताचे नाव आहे. मृताने सहा पानांची हस्तलिखीत ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली असून, त्यात महात्मा बसवेश्वर चौकाचे सौंदर्यीकरण करण्यासंदर्भात न.प. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अडचण आणल्याचा उल्लेख केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना २३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, जवाहर नवोदय विद्यालयासमोर वास्तव्यास असलेले शिवा संघटनेचे पदाधिकारी गोपाल महाजन यांनी मालेगाव मार्गावर असलेल्या एका शेतशिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी महाजन यांनी शिवा संघटनेचे राष्ट्रीय नेते प्रा. मनोहर धोंडे यांना व्हाॅटस ॲपवर एक संदेश पाठविला. याशिवाय सहा पानांची हस्तलिखीत ‘सुसाईड नोट’ पोलिसांना आढळून आली. त्यात महात्मा बसवेश्वर चौकाचे सौंदर्यीकरण करण्यासंदर्भात न.प.चे अधिकारी मानसिक त्रास देत असल्याचा उल्लेख आहे. प्रकरणाचा तपास करून योग्य न्याय मिळवून देण्याची ग्वाही ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार झळके यांनी दिली.

.......................

प्रा. मनोहर धोंडे यांना केलेल्या मॅसेजचा मजकूर

जय शिवा सर ! मी आणि आपल्या वाशिम जिल्ह्यातील शिवा मावळ्यांनी महात्मा बसवेश्वर चौक साैंदर्यीकरणासंदर्भात खूप प्रयत्न केला; परंतु न.प. च्या पदाधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिला. त्यांचा पूर्णपणे या गोष्टीला विरोध दिसत आहे. त्यामुळे मी खचून गेलो आहे. सर मला न्याय मिळाला पाहिजे, ही विनंती. माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास भ्रष्ट मुख्याधिकारी, इंजिनिअर किंवा नगराध्यक्ष यांच्याकडून व्हायला नको. तसेच माझ्या कुटुंबातील सर्व लोकांचे भविष्य उघड्यावर येणार आहे. माझी मुले लहान आहेत. त्यांचा खर्च माझ्या मजुरीमुळेच चालत होता. तरी मला महात्मा बसवेश्वर चौक करून आणि या भ्रष्ट लोकांना अद्दल घडवून मला न्याय द्यावा, ही एका कडवट मावळ्याची विनंती, असा मजकूर गोपाल महाजन यांनी सोशल मीडियाद्वारे प्रा. मनोहर धोंडे यांनी पाठविला आहे.

Web Title: Youth commits suicide by writing 'suicide note'