युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:52 IST2019-05-29T15:52:17+5:302019-05-29T15:52:20+5:30
उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या ग्राम येवता बंदी येथील संदीप अवधुतराव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना २९ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या ग्राम येवता बंदी येथील संदीप अवधुतराव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना २९ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली
कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राम येवताबंदी येथील संदीप अवधुतराव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गावालगतच असलेल्या सोपीनाथ महाराज संस्थान मंगल कार्यलयाच्या स्वयंपाक गृहाच्या समोरील भागात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवीली.
मृतक संदीप च्या मागे एक बहीण , दोन भाऊ व वडील असा बराच मोठा आप्त परिवार असून मृतक संदीप हा सर्वात लहान असून अविवाहित होता .मोलमजुरी करून तो आपला चरितार्थ चालवित होता .त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही .
याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी कलम १७४ जा. फौ. नुसार आकस्मिक मृत्यू ची नोंद घेवून कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे.