शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पीक नुकसान : ‘डाटा एन्ट्री’चे काम ८० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 2:44 PM

डाटा एन्ट्री तातडीने पूर्ण करून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनाम पूर्ण झाल्यानंतर या पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २.७९ लाखांहून अधिक हेक्टर नुकसाग्रस्त क्षेत्रापैकी ८० टक्के पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची ८० टक्के अचूक डाटा एन्ट्री प्रशासनाने केली असून, आता उर्वरित २० टक्के पंचनाम्यांची डाटा एन्ट्री तातडीने पूर्ण करून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. अंतिम अहवाल तयार करून प्रशासन ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार मदत निधीची मागणी शासनस्तरावर नोंदविणर आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यात प्रामुख्याने काढणी केलेले सोयाबीन, कपाशीसह फळपिके आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले. महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करून या नुकसानाचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाकडून विहित प्रपत्रात पंचनाम्यातील माहिती समाविष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले.सुटीच्या दिवशीही तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह अन्य सर्व कर्मचारी तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालयातील हजर राहून कर्मचाऱ्यांनी ‘डाटा एन्ट्री’चे काम केले. त्यामुळेच जिल्ह्यातील ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानाच्या पंचनाम्यांपैकी ८० टक्क्यांवर पंचनाम्यांची अचूक डाटा एन्ट्री करणे प्रशासनाला शक्य झाले.दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून, या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यासाठी बुधवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत उर्वरित पंचनाम्यांची डाटा एन्ट्री करून विभागीय आयुक्तांसह पीक विमा कं पनीकडे नुकसानभरपाईच्या मागणीचा अहवाल सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. कर्मचाºयांनी मंगळवारच्या सुटीलाही केले कामकाजजिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची कामे ८ नोव्हेंबरअखेर पूर्ण झाली. दरम्यान, ९ नोव्हेंबरपासून ‘डाटा एन्ट्री’चे काम प्रशासनाने हाती घेतले. यादिवशी दुसरा शनिवार असल्याने सुटी होती, त्यानंतर रविवारची सुटी होती; मात्र दोन्ही दिवशी कर्मचाºयांनी कामकाज केले. यासह मंगळवारी गुरूनानक जयंतीची सुटी असतानाही कामकाज सुरू असल्याचे दिसून आले.

पीकविमा न भरणाºया शेतकºयांचा स्वतंत्र अहवालजिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांना बसला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ३१५६२, रिसोड तालुक्यातील ३४२८७, मालेगाव तालुक्यातील ३०१६९, मंगरुळपीर तालुक्यातील २९२७४, मानोरा तालुक्यातील १६८४९, तर कारंजा तालुक्यातील ३२२१६ शेतकºयांचा समावेश आहे. त्यात पीक विमा भरणाºयांसह पीक विमा न भरणाºया शेतकºयांचाही समावेश आहे. पीक विमा भरणाºया शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. तर पीक विमा न भरणाºयांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारांचे स्वतंत्र अहवाल प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येत आहेत.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या बाधित क्षेत्रापैकी ८० टक्के पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ पूर्ण झाली आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर हे काम केले असून, आता उर्वरित पंचनाम्यांची डाटा एन्ट्री करून विभागीय आयुक्तांकडे अंतिम अहवाल बुधवार सायंकाळपर्यंत सादर करण्यात येणार आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारीवाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती