एक्स-रे मशीन होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:19+5:302021-02-05T09:24:19+5:30
................... उपकेंद्रांची कामे करण्याची मागणी तोंडगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे असलेल्या १३२ के.व्ही. पॉवरहाऊसमधून विद्युत प्रवाह घेण्यासाठी लाईन ...

एक्स-रे मशीन होणार कार्यान्वित
...................
उपकेंद्रांची कामे करण्याची मागणी
तोंडगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे असलेल्या १३२ के.व्ही. पॉवरहाऊसमधून विद्युत प्रवाह घेण्यासाठी लाईन टाकण्याचा प्रश्न रखडला आहे. त्यातच दोन विद्युत उपकेंद्रांची कामेही अद्याप अपूर्ण आहेत. यामुळे पैनगंगा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना सिंचनात अडथळा जाणवत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी शेतकरी सुभाष नानवटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली.
.....................
मिरची बीजोत्पादनात घाटा गाव अग्रेसर
वाशिम : मालेगाव तालुक्यातील घाटा येथील काही शेतकऱ्यांनी मिरची बीजोत्पादनात आघाडी घेतली आहे. शेडनेटमध्ये मल्चिंगचा आधार घेत मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. शेततळ्याच्या पाण्यामुळे अधिक फायदा होत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.
...................
बंद असलेल्या एस.टी. फेऱ्या झाल्या सुरू
वाशिम : २५ पेक्षा कमी भारमान असल्याचे कारण दाखवून वाशिम आगारांतर्गतच्या १० एस.टी. फेऱ्या कोरोना काळात बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढल्याने त्यातील सहा फेऱ्या सुरू केल्याची माहिती आगारप्रमुख विनोद इलामे यांनी दिली.
....................
जिल्हा रुग्णालयात पाण्याचा अभाव
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. पाण्याचे फिल्टरही बंद पडले असून याकडे लक्ष पुरविण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.