शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जंतनाशक गोळ्या दिल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST

वाशिम : कुपोषण, रक्ताक्षय आणि जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात ...

वाशिम : कुपोषण, रक्ताक्षय आणि जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २८ टक्के मुलांमध्ये जंतदोष आढळत असून, जिल्ह्यात शाळा बंद असलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच तर आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशातून जंतनाशक मोहीम राबविण्यात येते. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना दरवर्षी शाळेत जंतनाशक गोळीचे वाटप केले जाते. गतवर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा बंदच आहेत. जे वर्ग बंद आहेत; त्या वर्गातील मुलांना अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामार्फत घरपोच आणि शाळा सुरू असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. यंदा २१ सप्टेंबर रोजी जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

००००००००००००

काय आहे जंतदोष?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. २८ टक्के बालकांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून असा कृमी दोष होण्याची शक्यता आहे.

००००००००००००

वयाच्या १८ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या

वयाच्या १८ वर्षापर्यंत आरोग्य विभागातर्फे मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येते. वर्षातून दोन वेळा मोहीम राबविण्यात येते.

००००

गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?

पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंद असल्याने आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच गोळ्यांचे वाटप होणार आहे. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत वाटप होईल.