शिरपूर येथील श्वेतांबर जैन संस्थानच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:17 IST2018-10-01T16:15:42+5:302018-10-01T16:17:26+5:30
शिरपूर (वाशिम) : जैन धर्मियांची काशी म्हणून शिरपूरची ओळख आहे. येथे सन २०१४ पासून अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या पारसबाग संकुलात १५१ फुट उंचीचे भव्य चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे.

शिरपूर येथील श्वेतांबर जैन संस्थानच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर (वाशिम) : जैन धर्मियांची काशी म्हणून शिरपूरची ओळख आहे. येथे सन २०१४ पासून अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या पारसबाग संकुलात १५१ फुट उंचीचे भव्य चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. यासाठी राजस्थानी संगमरवरी दगडांचा वापर करून या मंदिराला अधिकाधिक आकर्षक बनविण्याचा मानस संस्थानने व्यक्त केला.
संपूर्ण भारतातून शिरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक येतात. शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्या पारसबाग संकुलात सध्या १५१ फुट उंचीचे चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. अत्यंत भव्य असे हे मंदिर राहणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव ठरावे, असे बांधकाम करण्याचा मानस संस्थानने व्यक्त केला. मंदिर निर्माण कार्य प्रगतीपथावर असून, यामुळे शिरपूर जैन हे पर्यटन केंद्र ठरणार आहे. राजस्थान राज्यातून हजारो कारागिर येथे संगमरवरी दगडांवर अत्यंत्य भव्य, रेखीव, कोरीव काम करीत आहेत. मशिनच्या साहाय्याने येथे संगमरवरी दगड बांधकामठिकाणी पोहचविले जात आहेत. प्राचीन वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळणार आहे. या मंदिराचे निर्माण कार्य विमलहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.