लोकवर्गणीतून मार्गी लागले पाणंद रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:09+5:302021-05-29T04:30:09+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत ग्राम लही येथील शेतकरी पाणंद रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झाले होते. पावसाळ्यात या रस्त्यावर ...

लोकवर्गणीतून मार्गी लागले पाणंद रस्त्याचे काम
मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत ग्राम लही येथील शेतकरी पाणंद रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झाले होते. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होऊन शेतकऱ्यांची वहिवाट बंद व्हायची. त्यामुळे रस्त्याचे काम करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून वेळोवेळी करण्यात आली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. आता पावसाळा तोंडावर असताना आणि शासन व प्रशासनाकडून पाणंद रस्त्याचे काम होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी लोकवर्गणी जमा करून या रस्त्याचे काम करत स्वत:च समस्या दूर केली.
या उपक्रमासाठी गजानन केंद्रे, रामराम केंद्रे, प्रकाश केंद्रे, भगवान केंद्रे, माणिक केंद्रे, प्रभाकर केंद्रे, संतोष केंद्रे, बाबाराव केंद्रे, प्रकाश केंद्रे, दत्ता केंद्रे, कैलास केंद्रे, विठ्ठल केंद्रे, गजानन केंद्रे, संजय केंद्रे, कैलास केंद्रे, नारायण केंद्रे, शिवाजी केंद्रे, भगवान दराडे, रामदास दराडे, विशाल बांगर, निवृत्ती बांगर, विलास बांगर, प्रकाश बांगर, दत्तराव बांगर, निवास बांगर, गणेश बांगर, बाबाराव बांगर, गंगाराम बांगर, घनश्याम आहिरकर, रामेश्र्वर आहिरकर, डॉ. सखाराम सिनगारे, मुरली नागुलकर, शामराव नागुलकर, संजय नागुलकर, भानुदास नागुलकर, डॉ. गोविदराव कोल्हे, रामजी कोल्हे, डॉ. दिलीप कोल्हे, विजय कोल्हे, निळकंठ कोल्हे, अशोक कोल्हे, दिलीप नागुलकर, महादेव नागुलकर, भेंडेकर आणि महादेव घुगे यांच्यासह ग्राम लही येथील गावकऱ्यांनी सहकार्य केले.