मालेगाव तहसील कार्यालयाच्या नविन इमारतीचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:07 IST2019-05-08T16:06:25+5:302019-05-08T16:07:13+5:30
अगदीच संथगतीने सुरू असलेले हे काम अद्यापपर्यंत अपूर्णच असून किमान उन्हाळ्यात तरी या इमारतीचे लोकार्पण अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मालेगाव तहसील कार्यालयाच्या नविन इमारतीचे काम संथगतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अगदीच संथगतीने सुरू असलेले हे काम अद्यापपर्यंत अपूर्णच असून किमान उन्हाळ्यात तरी या इमारतीचे लोकार्पण अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तत्कालिन मंत्री स्व. सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नांमधून मालेगाव येथे तहसील कार्यालयाच्या नविन भव्यदिव्य प्रशासकीय इमारतीसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून गेल्या दोन वर्षांपूर्वी इमारतीचे बांधकाम सुरू झाले. मात्र, धिम्यागतीने सुरू असलेले हे काम अद्यापपर्यंत अपूर्ण असल्याने जुन्या इमारतीतून स्थानांतरणाचा प्रश्न रखडला आहे. तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत विविध प्रकारच्या असुविधांमुळे कर्मचारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासोबतच या इमारतीचे लोकार्पणही तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.