Work in coordination with the Zilla Parishad, Panchayat Samiti elections | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी समन्वयाने काम करा
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी समन्वयाने काम करा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सहाही पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, निवडणूकीच्या आचारसंहितेची शासकीय विभाग व नियुक्त नोडल अधिकाºयांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी गुरूवारी दिल्या. आचारसंहिता अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर.डी. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, भूसंपादन अधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, कालिदास तापी, ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची कार्यवाही सर्व नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षाला सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.

Web Title: Work in coordination with the Zilla Parishad, Panchayat Samiti elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.