पांगरखेडा-चांडस पुलाच्या कामामुळे शेतरस्ते झाले बंद : शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 13:58 IST2017-12-16T13:57:09+5:302017-12-16T13:58:40+5:30
शिरपूर जैन: मालेगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षीत मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील पांगरखेडा-चांडस रस्त्यावर पुलाची बांधणी करण्यात येत आहे. यासाठी केलेल्या खोदकामाचा मलबा परिसरात टाकण्यात आल्याने शेतरस्त्यावरून वाहतूक बंद झाली आहे.

पांगरखेडा-चांडस पुलाच्या कामामुळे शेतरस्ते झाले बंद : शेतकरी त्रस्त
शिरपूर जैन: मालेगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षीत मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील पांगरखेडा-चांडस रस्त्यावर पुलाची बांधणी करण्यात येत आहे. यासाठी केलेल्या खोदकामाचा मलबा परिसरात टाकण्यात आल्याने शेतरस्त्यावरून वाहतूक बंद झाली आहे. परिणामी शेतातून माल आणण्यासह इतर कामांसाठी ट्रॅक्टर, बैलंबडी नेणे शक्य नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शिरपूर जैनपासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील पांगरखेडा-चांडस रस्त बुडित क्षेत्रात गेला आहे. प्रकल्पाच्या पाण्यामुळे हा रस्ता बंद पडू नये म्हणून या ठिकाणी नव्या उंच पुलाची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, या खोदकामातून निघालेला मलबा परिसरातील शेतरस्त्यांवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे शेतरस्ते अरूंद झाले असून, या शेतरस्त्यांवरून वाहने नेणे अशक्य झाले आहे. आता खरीप हंगामातील दीर्घकालीन पिकांपैकी तूर आणि कपाशीची काढणी सुरू आहे. तुरीच्या काढणीसाठी मळणीयंत्र आणि काढलेला शेतमाल घरी किंवा बाजारात नेण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलगाडी शेतात नेणे आवश्यक आहे; परंतु रस्ते बंद पडल्याने शेतकºयांना वेचलेली कपाशी घरी आणने आणि सोंगून ठेवलेली तूर काढण्यासाठी मळणीयंत्र शेतात नेणे अशक्य झाले आहे. लघू पाटबंधारे विभागाने शेतकºयांची अडचण लक्षात घेऊन शेतरस्त्यांवर टाकलेला मलबा योग्य प्रकारे पसरवून शेतरस्ता मोकळा करावा, अशी मागणी विलास वाघमारे, भगवान वाघमारे, रामकिसन जोशी, दगडूजी जाधव, खैरू गवळी यांच्यासह इतर शेतकºयांनी केली आहे.