लसीकरण शिबिराला महिलांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:27+5:302021-08-01T04:38:27+5:30
------------------ तणनाशक वापराविषयी ऑनलाईन प्रशिक्षण वाशिम: कृषी विज्ञान केंद्र वाशिमद्वारे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातील विविध प्रकारानुसार तणनाशकांचा वापर तसेच तणनाशके ...

लसीकरण शिबिराला महिलांचा प्रतिसाद
------------------
तणनाशक वापराविषयी ऑनलाईन प्रशिक्षण
वाशिम: कृषी विज्ञान केंद्र वाशिमद्वारे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातील विविध प्रकारानुसार तणनाशकांचा वापर तसेच तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी याबद्दल जागृत करण्याच्या दृष्टीने झूम मिट या ऑनलाईन माध्यमातून प्रशिक्षणाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले.
----
तूर पीक प्रात्यक्षिक, प्रशिक्षण
वाशिम: कृषी विज्ञान केंद्र वाशिम अंतर्गत मालेगाव तालुक्यातील विविध गावांत तूर पीक प्रात्यक्षिक धारक शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रशिक्षणाचे नियोजन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे करीत आहेत.
------
६५५ शाळांत इंटरनेटचा अभाव
वाशिम: जिल्ह्यातील १४१९ शाळांपैकी ६५५ शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्याचे शिक्षण विभागाकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. बहुतांश शाळांमधील शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी स्वत:चा स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन वापरावे लागत आहे.
----------
शेती शाळेला महिलांचा प्रतिसाद
वाशिम: सोयाबीनच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावी या हेतूने पानी फाऊंडेशनकडून दर आठवड्याला डिजिटल शेतीशाळा घेतली जात आहे. या शेती शाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
------
310721\31wsm_1_31072021_35.jpg
लसीकरण शिबिराला महिलांचा प्रतिसाद