विहीरीत पडून वृद्ध महिला जखमी
By Admin | Updated: February 27, 2015 00:50 IST2015-02-27T00:50:58+5:302015-02-27T00:50:58+5:30
विहिरीतून पिण्याचे पाणी काढताना घडली घटना.

विहीरीत पडून वृद्ध महिला जखमी
देपूळ (जि. वाशिम): पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेली देवकाबाई राजाराम यशवंतराव ही वृद्ध महिला २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३0 वाजता गावातील सार्वजनिक विहीरीमध्ये पडली. सुदैवाने येथे पाणी भरावयास असलेल्या इतर महिलांनी आरडाओरड केल्याने सुरेश गंगाराम मापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश मापारी यांच्या चमुने त्या विहीरीमध्ये उडी घेउन सदर महिलेचे प्राण वाचविले. यामध्ये सदर महिला किरकोळ जखमी झाली आहे. बोरी खुर्द, मापारी हे गाव दरवर्षी चार महिने भिषण पाणी टंचाईला तोंड देत असते यावर्षी मात्र जानेवारी पासूनच येथे भिषण पाणी टंचाई आहे. परंतु गावाबाहेरील सरकारी विहीरीला तात्पुरते पाणी आहे. याच विहीरीवरुन गावचा पाणी पुरवठा चालतो याच विहीरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेलेली देवकाबाई राजाराम यशवंतराव (वय ६0 वर्षे) ही वृद्ध महिला तोल गेल्यामुळे २३ रोजी सकाळी ८.३0 वाजता विहीरीत पडली उपस्थित येथील महिलांनी आरडा ओरड केल्यामुळे सुरेश गंगाराम मापारी व जि.प.सदस्या रेखा सुरेश मापारी यांचे पती सुरेश मापारी आपली चमू घेउन शेतात जात होते. ही आरडा ओरड ऐकून विहीरीमध्ये उडी घेउन सुरेश मापारी, देवानंद बंडू बलखंडे यांनी त्या महिलेचे प्राण वाचविले. महिलेले बाजेवर टाकून विहीरीबाहेर काढण्यात आले.