पाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव
By Admin | Updated: May 12, 2014 23:20 IST2014-05-12T23:10:11+5:302014-05-12T23:20:49+5:30
जंगलात अन्न-पाणी यांचा तुटवडा जाणवत आहे.

पाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव
मांडवा : अजून पावसाळा सुरू झाला नाही. अकाड्याने अंगाची लाही-हाही होत आहे. दरम्यान, जंगलातील जलसाठे कोरडे पडलेले आहेत. वनस्पतींची पालवी गळली आहे. त्यामुळे जंगलात अन्न-पाणी यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, माकड व अन्य वन्य प्राणी अन्नधान्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. जिल्ह्यातील कुर्हा-मांडवा, मेडशी परिसर जंगलाचा आहे. यामध्ये हरीण, वानर, मोर, कोल्हे, रानडुक्कर, ससे असे अनेक वन्य प्राणी आहेत. पण, वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. जंगलातील झाडांची राजरोस तोड होत असल्याने झाडांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. जंगलात प्राण्यांना लपण्यासाठी जागा नाही, पाणी व खाद्य नाही आदी कारणांमुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या भागातील जंगल अवैध वृक्षतोडीमुळे उजाड होत आहे. काही वर्षांपूर्वी घनदाट जंगल असलेल्या ठिकाणी आता उजाड माळरान दिसत आहे. अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पावसाचे प्रमाणही त्यामुळे कमी झाले आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यामुळे व खाद्य मिळत नसल्यामुळे वन्यजिवांचे हाल होत आहेत. परिणामी, वानर यासह इतर प्राणी-पक्षी गावाकडे येत आहेत