रानडुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 15:27 IST2019-03-13T15:27:09+5:302019-03-13T15:27:21+5:30

शिरपूरजैन (वाशिम) : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया वसारी येथील रामकिसन पुंजाजी लादे या ४७ वर्षीय इसमावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

Wild animal attack; man seriously injured | रानडुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी!

रानडुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी!

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया वसारी येथील रामकिसन पुंजाजी लादे या ४७ वर्षीय इसमावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. अकोला येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, वसारी येथील रामकिसन लादे हे १२ मार्च रोजी आपल्या शेतात कांदा पिकाला पाणी देत होते. यावेळी अचानक मागून आलेल्या रानडुकराने लादे यांना जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, मार अधिक असल्याने त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. याप्रकरणी रामकिसन लादे यांच्या नातेवाइकांनी वनविभागाच्या मेडशी कार्यालयात रितसर तक्रार नोंदवली आहे. मागील काही दिवसांपूर्वी दुधाळा व वसारी येथील शेतकºयांवरही रानडुकरांनी हल्ला चढविला होता. हा त्रास दिवसेंदिवस बळावत असून वनविभागाने त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Wild animal attack; man seriously injured

टॅग्स :washimवाशिम