पांढरे सोनेही काळवंडले; शेतकऱ्यांचे डोळे पाणावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:25+5:302021-09-24T04:48:25+5:30

००००००००००००००००००००००० कपाशीचे तालुकानिहाय क्षेत्र तालुका - अपेक्षित - कपाशीचे क्षेत्र (हेक्टर) वाशिम - ...

The white gold also turned black; Farmers' eyes watered! | पांढरे सोनेही काळवंडले; शेतकऱ्यांचे डोळे पाणावले!

पांढरे सोनेही काळवंडले; शेतकऱ्यांचे डोळे पाणावले!

०००००००००००००००००००००००

कपाशीचे तालुकानिहाय क्षेत्र

तालुका - अपेक्षित - कपाशीचे क्षेत्र (हेक्टर)

वाशिम - २६०.७२ - ६०३.६०

रिसोड - १६३.९३ - ४०३.००

कारंजा - ११७७.४७ - ५०९.००

मानोरा - २१९७.५७ - १२५६.९०

मंगरुळ - १८६७९५ - ११४३६.६२

मालेगाव १३५७७.५२ - ७१५८.००

००००००००००००००००००००००००००००

कपाशीची बोंडे सडण्याचे प्रकार व कारणे

१) बोंडाच्या बाहेरून होणारा संसर्ग : मृतजिवी, काही रोगकारक, बुरशी, काही प्रमाणात बोंडावरील करपा रोगाला कारणीभूत जिवाणूंमुळे बोंडे सडतात. ढगाळ वातावरण, सततचा पाऊस आणि हवामानातील आर्द्रताही बोंड सडण्यास कारणीभूत ठरते.

००००००००००००००

२) बोंडाच्या आतून होणारा संसर्ग : कमी प्राणवायू असताना तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि आंतरिक रोगकारक बुरशीच्या संसर्गामुळे आतून बोंड सडते. हवेतील अधिक आर्द्रता, कळ्यांवर व बोंडावर असलेल्या रसशोषक ढेकुणामुळेही हा प्रकार घडतो.

०००००००००००००००

नियंत्रणासाठी उपाययोजना

- बोंडाला चिकटून असलेल्या पाकळ्या हाताने काढणे.

- पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना रस शोषणाऱ्या ढेकूण किडीचा प्रतिबंध करणे.

- सततचे ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता व पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारी म्हणून पात्या, फुले विकसित होण्याच्या अवस्थेत असताना कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने १५ दिवसांनी फवारणी करणे.

- आंतरिक संसर्गासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के डब्ल्यूपी), २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.२ ग्रॅम, तर बाहेरील बुरशी रोखण्यासाठी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझीम (५० टक्के डब्लूपी) १ ग्रॅम किंवा पायरस्क्लोस्ट्रॉबिन (२० टक्के डब्लूपी) १ ग्रॅम गरजेनुसार फवारणे.

००००००००००००००००

कोट : सततचा पाऊस हवेतील आर्द्रता आदींमुळे कपाशीची बोंडे सडून गळतात. हा प्रकार नेमका काेणत्या भागात आणि किती प्रमाणात आहे, त्याचे सर्वेक्षण करून नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांना देण्यात येतील.

- शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: The white gold also turned black; Farmers' eyes watered!