अभियंत्यांची तीन पदे केव्हा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST2021-09-03T04:44:26+5:302021-09-03T04:44:26+5:30

०००००००००० प्रवास भत्त्यात वाढ करण्याची मागणी वाशिम : ग्रामविकास विभागाने नऊ वर्षांनंतर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० ...

When will the three posts of engineers be filled? | अभियंत्यांची तीन पदे केव्हा भरणार?

अभियंत्यांची तीन पदे केव्हा भरणार?

००००००००००

प्रवास भत्त्यात वाढ करण्याची मागणी

वाशिम : ग्रामविकास विभागाने नऊ वर्षांनंतर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, महागाईच्या काळात ही वाढ तोकडी असून, संघटनेच्या मागणीनुसार तीन हजार रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेमधून होत आहे.

०००००

घरकुल लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा

वाशिम : शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील अनेक लाभार्थींना अनुदानाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. याकडे पंचायत समिती प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी लाभार्थींनी बुधवारी केली.

०००००००

रस्ता कामामुळे वाहतुकीस अडथळा

वाशिम : पाटणी चाैक ते अकोला नाका यादरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. जुन्या जिल्हा परिषद इमारतीसमोरून गेलेल्या रस्त्यालगत वाहतूक प्रभावित होत आहे.

००००००

मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त

वाशिम : शहरातील खामगाव जीन, अल्लाडा प्लाट भागात विशेषत: रात्रीच्या सुमारास मोकाट श्वान अंगावर धावून येण्याचा प्रकार बळावला आहे. यामुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त झाले असून, न.प.ने या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

००००००००००००००

नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वाशिम : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. गुरुवारी वाशिम शहरात ८७ जणांवर कारवाई करण्यात आली.

००००

ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर

वाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही काही ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे दिसून येते. दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून पाण्यात ब्लिचिंग पावडरचा नियमित वापर करावा, अशी मागणी नागरिकांनी बुधवारी केली.

०००००

जुनी पेन्शन योजना लागू करावी

वाशिम : राज्यात ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना विनाअट १९८२ ची जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन कोअर कमिटीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली.

Web Title: When will the three posts of engineers be filled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.