पाणंद रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळणार कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:19+5:302021-09-13T04:41:19+5:30
वाशिम तालुक्यातील काही पाणंद रस्त्याचे प्राथमिक स्तरातील काम रोजगार हमी योजनेतून झाले आहे, तर काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत ...

पाणंद रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळणार कधी
वाशिम तालुक्यातील काही पाणंद रस्त्याचे प्राथमिक स्तरातील काम रोजगार हमी योजनेतून झाले आहे, तर काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम तालुक्यातील गट ग्रामपंचायत शेलगाव घुगेअंतर्गत दगड उमरा परिसरातील सततच्या पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले आहेत. पाणंद रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी त्रस्त असून पाणंद रस्त्याच्या कामांना मुहूर्त मिळणार कधी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
----------------------------------------
कोट : आम्हाला शेतात शेती अवजारे, गाडी बैल, ट्रॅक्टर ने-आण करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्याचा त्रास कमी करावा,
- गजानन पांडुरंग पाठे, शेतकरी,
दगड उमरा
----------------------------------------
कोट : शेतात खुरपणी, फवारणी, कापणी ही सर्व कामे पावसाळ्यात करावी लागतात. पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आम्हाला मोठा त्रास होतो. सतत चिखल तुडवत राहिल्याने शेतकऱ्यांच्या पायाला त्वचारोगही झाले आहेत.
- रवी विठल पाठे,
शेतकरी, दगड उमरा.