परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेस कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:11+5:302021-07-31T04:41:11+5:30
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, शासनाने ७ जूनपासून सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात अनलॉकमधील काही ...

परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेस कधी सुरू होणार?
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, शासनाने ७ जूनपासून सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात अनलॉकमधील काही निर्बंध वगळता सर्व प्रकारच्या बाजारपेठा व उद्योग-व्यवसाय आठवड्यातील पाच दिवस सायंकाळी ४ पर्यंत सुरू ठेवण्याच्या मुभा आहेत. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, एसटीची परराज्यातील रातराणी सेवा बंदच असून, उद्योग-व्यवसायानिमित्त परराज्यात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
----------
१) सध्या राज्यांतर्गत केवळ एक रातराणी
जिल्ह्यातील वाशिम, रिसोड आणि मंगरूळपीर या आगारातून पूर्वी अनुक्रमे वाशिम-सिल्लोड, रिसोड-पुणे आणि मंगरूळपीर-पुणे या तीन रातराणी बसेस सुरू होत्या. आता यातील केवळ वाशिम-सिल्लोड ही रातराणी बस सुरू असून, तीसुद्धा स्थिती पाहूनच सोडली जाते. रिसोड-पुणे तीन वर्षांपासून, तर मंगरूळपीर-पुणे ही रातराणी साधारणत: वर्षभरापासून बंदच आहे.
-वाशिम-सिल्लोड
--------
२) परराज्यात जाणाऱ्या रातराणी बंदच
जिल्ह्यात एसटी महामंडळाचे चार आगार आहेत. त्यात कारंजा, मंगरूळपीर, वाशिम आणि रिसोड या आगाराचा समावेश असून, यापैकी केवळ वाशिम येथील आगारातून परराज्यात जाणारी वाशिम-हैदराबाद ही रातराणी बस सुरू होती. आता गेल्या दीड वर्षापासून ही बस बंदच आहे. त्यामुळे या बसने हैदराबाद किंवा परराज्यातील त्या मार्गावरच्या गावी जाणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
- वाशिम-हैदराबाद
------
३) सीमेवरील गावापर्यंतचा प्रवासही अडचणींचा (दोन प्रवाशांच्या प्रतिक्रिया)
कोट : जिल्ह्यात परराज्यात जाणारी एकही रातराणी किंवा इतर बससुद्धा सुरू नाही. पूर्वी वाशिम आगारातून हैदराबादसाठी एक बस सुरू होती. आता ही बसही बंद असून, या मार्गावर सीमेपर्यंतचा प्रवाससुद्धा बसगाड्या बदलत करावा लागतो.
-रूपेश पाटील,
प्रवासी
------
कोट : वाशिम येथील आगारातून सुटणारी वाशिम-हैदराबाद ही बस आमच्यासाठी सोयीची होती. या बसने आम्ही कधीकधी प्रवास करायचो. आता दोन वर्षांपासून ही बसच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हैदराबादकडे जाण्यासाठी वारंवार बसगाड्या बदलाव्या लागतात.
-संतोष चौधरी,
प्रवासी
----------
४) आगार व्यवस्थापक कोट
कोट: वाशिम आगारातून पूर्वी वाशिम-हैदराबाद ही परराज्यात जाणारी बस सुरू होती. आता कोरोना पार्श्वभूमीवर ती बंद करण्यात आली आहे. राज्यांतर्गत वाशिम-सिल्लोड ही रातराणी सुरू आहे; परंतु तीसुद्धा परिस्थितीचे अवलोकन करूनच सोडावी लागते. प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.
-विनोद ईलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम