०००००००००००००००
आययुडीपी कॉलनीत पथदिवे बंद
वाशिम : नवीन आययुडीपी कॉलनीतील काही पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य असते. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी तेजराव वानखेडे यांनी शनिवारी केली.
०००००
शौचालयाचा वापर करण्याकडे दुर्लक्ष
वाशिम : केनवड परिसरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेकांना शौचालय उभारून देण्यात आले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर घाण करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
००००
संपर्कातील व्यक्तींची चाचणी
वाशिम : सावरगाव बर्डे येथे सोमवारी एक जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या माहितीचे संकलन आणि कोरोना चाचणी केली जाणार आहे.
०००००
कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरटीपीसीआर, ॲंटिजन चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग बहुतांशी नियंत्रणात आल्याने आणि लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती आहे.
००००
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबले आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह अन्य नागरिकांना बसत आहे.