वाशिम जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र वाढले; ३३ हजार हेक्टरवर पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 02:48 PM2020-01-13T14:48:35+5:302020-01-13T14:48:41+5:30

जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे.

Wheat fields grow in Washim district; Sow on 33 thousand hectares! | वाशिम जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र वाढले; ३३ हजार हेक्टरवर पेरणी !

वाशिम जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र वाढले; ३३ हजार हेक्टरवर पेरणी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामातील ९९ टक्के पेरणी ऊरकली आहे. यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढले आहे, तथापि विषम वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादूर्भावही झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने सप्टेंबर अखेरपर्यंतही जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांवरही आली नव्हती. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात घट होण्याची भीती निर्माण झाली होती. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षीत पाण्याचा अंदाज घेऊन यंदा सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला आणि आॅक्टोबर महिन्याच्या मध्यंतरी, तसेच नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे ८० टक्के जलप्रकल्पात शंभर टक्के जलसाठा झाला. तथापि, अवकाळी पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने रब्बीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला. तथापि, जमिनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला. त्यामुळेच जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ९१ हजार ९०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी उरकली आहे. हे प्रमाण जवळपास ९९ टक्क्यांच्यावर आहे. गव्हाशिवाय जिल्ह्यात नेहमीप्रमाणे हरभरा पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. तथापि, हरभºयाच्या क्षेत्रात मात्र अपेक्षीत वाढ झाली नाही. जिल्ह्यात हरभºयाचे क्षेत्र ६२ हजा ३९२ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. तृणधान्यापैकी मका वगळता इतर पिकांचे क्षेत्र घटले आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ६९ हेक्टर असताना ११६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे.


जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास ९९ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. यावेळी गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. हरभºयाचे क्षेत्रही तुलनेने बºयापैकी आहे. वातावरणातील बदलाचा पिकांवर निश्चितच परिणाम होतो. शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्या. काही शंका असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- एस.एम. तोटावर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

Web Title: Wheat fields grow in Washim district; Sow on 33 thousand hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.